महाराष्ट्र
चार पोलिस उपायुक्तांसह निरीक्षकांच्या बदल्या
ठाणे : ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आज चार पोलिस उपायुक्तांसह पोलिस निरीक्षक, उप पोलिस निरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या केल्या.
ठाणे परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांची विशेष शाखा एकच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मुख्यालय एकचे उपायुक्त सुभाषचंद्र बुरसे यांची बदली करण्यात आली आहे. परिमंडळ दोन भिवंडीचे उपायुक्त नवनाथ ढवळे यांची ठाण्याच्या मुख्यालय 2च्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांची बदली करण्यात आली आहे.
नऊ सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ३८ पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांची वाहतूक शाखा राबोडी विभागाच्या पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. कळवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांची गुन्हे शाखेत, मुंब्रा पोलिस ठाण्याचे निवृत्ती कोल्हटकर यांची देखील गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. कापुरबावाडी पोलीस ठाण्याचे संजय निंबाळकर यांची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर २९ सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि ४५ उप पोलिस निरीक्षक यांच्या काल रात्री बदल्या करण्यात आल्या आहेत. काही दिवसात आणखी पोलीस हवालदार आणि पोलिस शिपाई यांच्या देखिल बदल्या करण्यात येणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पारदर्शक आणि चांगल्या प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. या उद्देशाने तसेच ज्यांचा कार्यकाळ तीन वर्षापेक्षा जास्त झाला आहे अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ठाणेवैभवला सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600