जिल्हा

ठाणे रेल्वे स्थानकात दोन ज्यादा आरक्षण खिडक्या

ठाणे रेल्वे स्थानकात दोन ज्यादा आरक्षण खिडक्या
ठाणे रेल्वे स्थानकात दोन ज्यादा आरक्षण खिडक्या फोटो: ठाणे वैभव
गौरी गणपतीसाठी रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा ठाणे: गेल्या चार वर्षांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु कराव्यात ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती. खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केल्याने आजपासून या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु झाल्या असून त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गणेशोत्सव सुरु व्हायच्या तीन महिने आधीपासूनच मुंबई, ठाणे आणि उपनगरात स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागतात. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रवास हा सुखकर असल्याने लाखो गणेशभक्त कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र अपुऱ्या आरक्षण खिडक्यांमुळे गणेशभक्तांची वेळ वाया जाते आणि रांगेत उभे राहून दमछाक होत होती. ही गैरसोय दूर व्हावी यासाठी प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु करण्याची मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांना प्रवाशांच्या प्रश्नांची जाणीव असल्याने अवघ्या काही दिवसातच ही मागणी त्यांनी मध्य रेल्वेकडून मान्य करुन घेतली. 20 जून ते 5 जुलै 2025 या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकाजवळील मुख्य पोस्ट ऑफिस इमारतीसमोरील मुख्य आरक्षण केंद्र येथे या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या (खिडकी क्रमांक 7 आणि 8) सुरु राहणार आहेत. आज 20 जून रोजी खासदार नरेश म्हस्के यांनी या दोन खिडक्यांचे उद्घाटन केले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, शहर संघटक भास्कर पाटील, रेल्वेचे अधिकारी रणजित झा, स्टेशन मास्तर केशव तावडे, किरण नाक्ती, प्रकाश पायरे, रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, संतोष बोडके, प्रितम रजपूत, निखिल बुजबुडे, प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवा सेना, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600