जिल्हा

लोकलवर दरड कोसळून दोन प्रवासी जखमी

लोकलवर दरड कोसळून दोन प्रवासी जखमी
लोकलवर दरड कोसळून दोन प्रवासी जखमी फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळून डब्यातील दोन प्रवासी जखमी झाले. हा अपघात कसारा रेल्वे स्टेशनजवळ मंगळवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान झाला आहे. बाळू जाधव रा. पंचशीलनगर, कसारा आणि तुकाराम जाधव रा.शिवाजी नगर, कसारा अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. मुंबईहून कसाऱ्याला येणारी लोकल कसारा स्टेशनजवळ आली असताना रेल्वे रुळांजवळ असलेल्या डोंगरावरून दगड आणि मातीचा ढीग लोकलच्या एका डब्यावर कोसळला. त्यातील काही दगड आणि माती दरवाजांमधून डब्यात शिरली. त्यावेळी दरवाजाजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांपैकी दोन प्रवाशांना दुखापत झाली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे दरड कोसळली त्या ठिकाणी येणा-या प्रत्येक लोकलचा वेग खुप कमी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600