जिल्हा
ग्रील तुटल्याने दोन लहान मुले खाली पडली
ठाणे: उल्हासनगरमध्ये खिडकीच्या ग्रीलमध्ये बसलेली दोन लहान मुले ग्रील तुटल्याने दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन्ही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील गांधी रोडवर हरे कृष्णा इमारत असून त्यातील दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटच्या ग्रीलमध्ये सात वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी असे दोन लहानगे बसलेले होते. याचवेळी ग्रील तुटून खाली कोसळले. सुदैवाने बिल्डिंगच्या कंपाउंडला असलेल्या पत्र्यांवर ही ग्रील कोसळल्याने मुलांचा जीव वाचला. मात्र, त्यापैकी सात वर्षीय मुलाचे दात पडले असून डोक्यालाही इजा झाली आहे. तर मुलीलाही किरकोळ जखम झाली आहे. या दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600