जिल्हा
दोन टेम्पो आगीत जळून खाक
दोन टेम्पो आगीत जळून खाक
फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या दोन रिकाम्या टेम्पो वाहनांना भीषण आग लागल्याने जळून खाक झाल्याची घटना अंबरनाथच्या बारकू पाडा परिसरात घडली आहे.
बारकुपाडा परिसरात कोंबडी वाहतूक करणाऱ्या दोन टेम्पोना मध्यरात्रीच्या सुमारास बारकुपाडा परिसरातील प्रिंस्टन फ्लेयर इमारतीच्याजवळ आग लागल्याची घटना घडली. एका नाल्याच्या पुलावर कोंबड्या वाहतूक करणाऱ्या दोन टेम्पो उभे होते. मात्र मध्यरात्री अचानक दोन्ही वाहनांनी पेट घेतला. दरम्यान ही आग अचानक लागली की अज्ञाताने लावली याची माहिती समजू शकली नाही.
आगीची घटना समजताच वाहन मालक आणि इतर नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600