जिल्हा

तिजोरीत खडखडाट असताना उल्हासनगरचे नगरसेवक गुवाहाटीत

तिजोरीत खडखडाट असताना उल्हासनगरचे नगरसेवक गुवाहाटीत
तिजोरीत खडखडाट असताना उल्हासनगरचे नगरसेवक गुवाहाटीत फोटो: ठाणे वैभव
उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना ६५ लाख रुपये खर्चून नगरसेवक शहरातील समस्या सोडून गुवाहाटीत चार दिवसीय दौऱ्याला गेले. त्यांच्या या दौऱ्यावर आता टीकेची झोड उठवली जाते आहे. २२ ते २६ जुलै दरम्यान हा अभ्यास दौरा झाल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेच्या सचिव कार्यालयाने दिली. प्रशिक्षण गुवाहाटीतील पंचतारांकीत रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये प्रस्तावित होते. या चार दिवसांच्या मुक्कामात चार वेळचा चहा नाष्टा, पाच वेळचे दुपारचे जेवण, चार रात्रीचे जेवण, पाच दिवसांकरिता शहरांतर्गत प्रकल्प भेटींसाठी गाडी, सभागृह, प्रवास खर्च, स्टेशनरी अशी व्यवस्था करण्यासाठी प्रति नगरसेवक ५२ हजार ९८० रुपये खर्च नियोजित होता. मुंबई-गुवाहाटी-मुंबई या प्रवासासाठी २१ हजार ७४० रुपये अदा करण्यात येणार होते. त्यामुळे अंदाजे प्रति व्यक्ती ७४ हजार ७२० रुपये खर्च अपेक्षित होता. या दौऱ्यासाठी एकूण ६५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती, अशी माहिती पालिकेच्या सचिव कार्यालयाने दिली. मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने हे प्रशिक्षण देण्यात आले, अशी माहिती पालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्राजक्त कुलकर्णी यांनी दिली. प्रशासकीय कामकाज समजून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणाची गरज असते. पण शहरातील समस्या व पालिकेची आर्थिक स्थिती समजून घेत कोणत्या गोष्टींनी प्राधान्य द्यावे हे ठरवण्याची गरज आहे, अशी टीका काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे यांनी केली. प्रशासकीय कामकाज समजून घेण्यासाठी हा चार दिवसीय अभ्यास दौरा होता. शहराचा कारभार चालवण्यासाठी याची गरज पडते असे स्पष्टीकरण महापौर अश्विनी निकम यांनी दिले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600