जिल्हा

मुंब्र्यात बेशिस्त रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांची पळापळ

मुंब्र्यात बेशिस्त रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांची पळापळ
मुंब्र्यात बेशिस्त रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांची पळापळ फोटो: ठाणे वैभव
ठामपा आणि पोलिसांची संयुक्त कारवाई ठाणे: मुंब्रा भागातील रस्ते अडवून प्रामाणिक नागरिकांना त्रास देणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांच्या विरोधात मुंब्रा पोलिस, वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची दोन दिवसांची संयुक्त कारवाई सुरू असून फेरीवाले आणि रिक्षा चालकांची पळापळ सुरु झाली आहे. मुंब्रा शहरातून पनवेलकडे जाणाऱ्या महामार्गावर सकाळ-संध्याकाळ फेरीवाल्यांचे साम्राज्य असते. त्यात बेशिस्त रिक्षाचालक आणि दुचाकी चालक रस्त्यावर गाड्या उभ्या करत असल्याने या भागातील नागरिकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. फेरीवाले आणि रिक्षाचालक महापालिका कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांबरोबर अर्थपूर्ण व्यवहार करून बिनधास्त रस्ता अडवून त्यांचा व्यवसाय करत असल्याने त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नव्हती. कारवाई केली तर ती थातूरमातुर असल्याने या भागातील नागरिक निमूट अन्याय सहन करत होते. या भागातील फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन मुंब्रा पोलिस, मुंब्रा वाहतूक विभाग पोलिस आणि मुंब्रा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाने ११ नोव्हेंबरपासून संयुक्त कारवाईला सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी ५ ते ९ या दरम्यान कौसा कब्रस्तान ते मित्तल कट, एम गेट सिमला पार्क, एम एम व्हॅली येथे केलेल्या कारवाईमध्ये ६१ बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली तर ७० फेरीवाल्यांच्या हातगाड्या जागीच जमीनदोस्त करण्यात आल्या. काल १३ नोव्हेंबर रोजी एम गेट, मित्तल कट, शिमला पार्क, कौसा कब्रस्तान या दरम्यान ९१ बेशिस्त रिक्षाचालक आणि २५ फेरीवाले यांच्या विरोधात कारवाई करून दणका दिला आहे, त्यामुळे बेशिस्त रिक्षा चालकांना चाप बसला असून या भागातील नागरिकांनी त्याचे स्वागत केले. ही कारवाई मुंब्रा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर, मुंब्रा वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक अतुल अहिरे, मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त विजय कवळे, अतिक्रमण विभागाचे प्रमोद खरात यांच्या पथकाने ही कारवाई केली. या भागातील वाहतूक कोंडी विरोधात अशाच प्रकारे नियमित कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600