पुरुष एकेरीत ठाण्याचा तरुण खेळाडू सर्वेश यादव याने उपांत्यपूर्व फेरीत नागेश चामले याचा १९-२१, २१-१८, २१-८ असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्याने हिमांशु देसाई याला २१-१२, २१-१० असे सहज हरवले. मात्र अंतिम सामन्यात त्याला संकल्प गुराला याच्याकडून २१-१६, २१-१३ असा पराभव पत्करावा लागला आणि त्याने रौप्य पदकाची कमाई केली.
महिला दुहेरीत इशिता कोरगावकर व वृध्दी चाफेकर यांनी कांस्य पदक पटकावले, तसेच मिश्र दुहेरीत अमन नौशाद व सोनाली मिर्खेलकर यांनी कांस्याची कमाई केली. याशिवाय इतर खेळाडूंनीही उपांत्य फेरी गाठत ठाण्याची ताकद ठळकपणे दाखवून दिली.
मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड म्हणाले, “महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित सिनियर राज्य स्पर्धेत खेळाडूंनी दाखवलेली सातत्यपूर्ण कामगिरी ही ठाणेकरांच्या मेहनतीचे प्रतिक आहे. क्वार्टर फायनलमध्ये ११ ठाणेकर खेळाडूंची उपस्थिती आणि आठ पदकांची कमाई ही ठाण्यातील बॅडमिंटनची ताकद स्पष्ट करणारी आहे.”
जिल्हा
सिनिअर राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ठाणेकरांचे निर्विवाद वर्चस्व!

फोटो: ठाणे वैभव
पुरुषांच्या सांघिक अजिंक्यपदाबरोबरच वैयक्तिक आठ पदके
ठाणे: छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या योनेक्स-सनराईज कै. श्री. नंदू नाटेकर स्मृती महाराष्ट्र सिनियर स्टेट बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण आठ पदकं पटकावत राज्यातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
सर्वप्रथम झालेल्या सांघिक स्पर्धेत प्रथमेश कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ठाण्याच्या संघात अनुभवी तसेच तरुण खेळाडूचा समावेश होता. सर्वप्रथम ठाण्याने नाशिक संघाचा अटीतटीच्या लढतीत तीन विरुद्ध दोन असा निसटता पराभव केला. त्यानंतर सातारा, नागपूर व शेवटी अंतिम फेरीत महामुंबई संघाचाही अनुक्रमे 3/0 असा धुव्वा उडवून ठाणे संघाने अजिंक्य पदावर आपली मोहोर उमटवली. या संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून मयुर घाटणेकर व मितेश हजीरनिस यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
विशेष म्हणजे, या प्रतिष्ठेच्या वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत (क्वार्टर फायनल्स) तब्बल १६ पैकी ११ खेळाडू ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचेच होते. दीप रांभिया व रितिका ठाकूर यांनी मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक पटकावत ठाण्याचा झेंडा उंचावला. या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत ठाण्याच्या इअन लोपेस व अनामिका सिंह यांना २१-१०, २१-१४ ने पराभूत केले. उपांत्य फेरीत ठाण्याच्याच अमन नौशाद व सोनाली मिर्खेलकर यांना १७-२१, २१-१५, २१-१८ असा पराभव देत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात पुन्हा ठाण्याच्याच अमन एफ. एस. व अनघा करंदीकर यांच्याशी सामना झाला. तीन गेम्सपर्यंत रंगलेल्या या पॉवरपॅक्ट लढतीत दीप-रितिका जोडीने ३०-२९, २१-२३, २१-१३ असा रोमांचक विजय मिळवत सुवर्णपदकाची कमाई केली.
पुरुष एकेरीत ठाण्याचा तरुण खेळाडू सर्वेश यादव याने उपांत्यपूर्व फेरीत नागेश चामले याचा १९-२१, २१-१८, २१-८ असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्याने हिमांशु देसाई याला २१-१२, २१-१० असे सहज हरवले. मात्र अंतिम सामन्यात त्याला संकल्प गुराला याच्याकडून २१-१६, २१-१३ असा पराभव पत्करावा लागला आणि त्याने रौप्य पदकाची कमाई केली.
महिला दुहेरीत इशिता कोरगावकर व वृध्दी चाफेकर यांनी कांस्य पदक पटकावले, तसेच मिश्र दुहेरीत अमन नौशाद व सोनाली मिर्खेलकर यांनी कांस्याची कमाई केली. याशिवाय इतर खेळाडूंनीही उपांत्य फेरी गाठत ठाण्याची ताकद ठळकपणे दाखवून दिली.
मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड म्हणाले, “महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित सिनियर राज्य स्पर्धेत खेळाडूंनी दाखवलेली सातत्यपूर्ण कामगिरी ही ठाणेकरांच्या मेहनतीचे प्रतिक आहे. क्वार्टर फायनलमध्ये ११ ठाणेकर खेळाडूंची उपस्थिती आणि आठ पदकांची कमाई ही ठाण्यातील बॅडमिंटनची ताकद स्पष्ट करणारी आहे.”
पुरुष एकेरीत ठाण्याचा तरुण खेळाडू सर्वेश यादव याने उपांत्यपूर्व फेरीत नागेश चामले याचा १९-२१, २१-१८, २१-८ असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्याने हिमांशु देसाई याला २१-१२, २१-१० असे सहज हरवले. मात्र अंतिम सामन्यात त्याला संकल्प गुराला याच्याकडून २१-१६, २१-१३ असा पराभव पत्करावा लागला आणि त्याने रौप्य पदकाची कमाई केली.
महिला दुहेरीत इशिता कोरगावकर व वृध्दी चाफेकर यांनी कांस्य पदक पटकावले, तसेच मिश्र दुहेरीत अमन नौशाद व सोनाली मिर्खेलकर यांनी कांस्याची कमाई केली. याशिवाय इतर खेळाडूंनीही उपांत्य फेरी गाठत ठाण्याची ताकद ठळकपणे दाखवून दिली.
मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड म्हणाले, “महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित सिनियर राज्य स्पर्धेत खेळाडूंनी दाखवलेली सातत्यपूर्ण कामगिरी ही ठाणेकरांच्या मेहनतीचे प्रतिक आहे. क्वार्टर फायनलमध्ये ११ ठाणेकर खेळाडूंची उपस्थिती आणि आठ पदकांची कमाई ही ठाण्यातील बॅडमिंटनची ताकद स्पष्ट करणारी आहे.”
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600