महाराष्ट्र

सफाई कामगारांना वारसा हक्क आणि घरांचा लाभ विना अडथळा

* आमदार संजय केळकर यांच्या तक्रारीची दखल * मंत्री संजय शिरसाट यांचे कारवाईचे निर्देश मुंबई: लाड-पागे समितीच्या अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्क आणि घरांचा लाभ देताना अनेक ठिकाणी अधिकारी अंमलबजावणी करत नसल्याचे आमदार संजय केळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात निदर्शनास आणले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अंमलबजावणी करण्यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. विधिमंडळात प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना आमदार संजय केळकर यांनी सांगितले की लाड-पागे अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळावा म्हणून मी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू झाल्यानंतर सुमारे ५० हजार सफाई कामगारांना लाभ मिळणार आहे. पण अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कामगारांना दुर्लक्षित केले जाते. याबाबत कठोर अंमलबजावणीसाठी परिपत्रक काढणार का? असा प्रश्न श्री.केळकर यांनी उपस्थित केला. लाड-पागे अहवालानुसार केवळ सफाई कामगारच नव्हे तर जे-जे घाणीत काम करतात अशा सर्व कामगारांना लाभ मिळायला हवा, या पार्श्वभूमीवर फायलेरिया विभागातील कामगारांनाही याचा लाभ मिळायला हवा, अशी मागणी श्री.केळकर यांनी केली. सफाई कामगारांना हक्काची घरे देण्याबाबतही अनेक ठिकाणी चालढकल होत असून राज्य शासन याबाबत स्पष्ट निर्देश देणार आहे का, असा प्रश्न श्री.केळकर यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधितांना परिपत्रक पाठवण्यात आल्याचे सांगितले. श्री.केळकर यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली असून सफाई कामगारांच्या लाभाबाबत चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच या कामगारांच्या घरांबाबत देखील लवकरच बैठक घेऊन घरे देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600