जिल्हा

विलास जोशी अध्यक्ष, विकास रेपाळे सचिवपदी

विलास जोशी अध्यक्ष, विकास रेपाळे सचिवपदी
विलास जोशी अध्यक्ष, विकास रेपाळे सचिवपदी फोटो: ठाणे वैभव
ठाणे : मुंबई क्रिकेट संघटनेला संलग्न असलेल्या एकशे दोन वर्षांच्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या अध्यक्षपदी विलास जोशी यांची निवड करण्यात आली आहे. तर विकास रेपाळे संस्थेच्या सचिवपदाचा कार्यभार सांभाळतील. नुकत्याच झालेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत विलास जोशी आणि विकास रेपाळे यांच्या नेतृत्वाखाली स्पोर्टिंग क्लब पॅनलने नऊपैकी पाच जागा जिंकून आपले वर्चस्व राखले होते. विलास जोशी यांच्या नविन कार्यकारिणीत ॲड कैलास देवल संस्थेचे नवीन उपाध्यक्ष असतील. नव्या कार्यकारिणीत दोन स्वीकृत सदस्यांसह तीन निमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र हे निमंत्रित सदस्य मतदान करू शकणार नाहीत. स्वीकृत सदस्यांमध्ये जितेंद्र मेहता आणि सतीश नाचणे यांचा समावेश आहे. जितेंद्र मेहता यांच्याकडे खजिनदारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर सतीश नाचणे संस्थेचे सहसचिव (प्रशासन) काम पाहतील. निमंत्रित सदस्यांमध्ये मनोज यादव, प्रशांत गावंड आणि प्रफुल्ल वैद्य यांचा समावेश आहे. प्रशांत गावंड यांना स्वीकृत सदस्य पदाकरता विचारणा करण्यात आली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव गावंड यांनी स्वीकृत सदस्य होण्यास नकार देत निमंत्रित सदस्य म्हणून काम करण्यास संमती दिली. नवीन कार्यकारिणी मंडळाची मुदत १ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२८ अशी असणार आहे. कार्यकारी मंडळ: अध्यक्ष: विलास जोशी, उपाध्यक्ष: ॲड कैलास देवल, सचिव: विकास रेपाळे, खजिनदार: जितेंद्र मेहता (स्वीकृत सदस्य), सह सचिव (क्रिकेट): श्रावण तावडे, सह सचिव (प्रशासन): सतीश नाचणे, सदस्य: किरण साळगावकर, अतुल फणसे, डॉ.राजेश मढवी, डॉ. योगेश महाजन, दिलिप धुमाळ. निमंत्रित सदस्य: मनोज यादव, प्रशांत गावंड, प्रफुल्ल वैद्य. क्रिकेट मैदान विकास समिती: किरण साळगावकर, श्रावण तावडे, मनोज यादव, राहुल कदम, सतिश नाचणे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600