जिल्हा
ट्रान्सफॉर्मर गावात आणण्यासाठी ग्रामस्थांची कसरत
ट्रान्सफॉर्मर गावात आणण्यासाठी ग्रामस्थांची कसरत
फोटो: ठाणे वैभव
दहा ते १२ ग्रामस्थ आणि श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी चाके असलेल्या फळकुट्यावर ट्रान्सफॉर्मर ठेवून तो ढकलत ढकलत गावात नेला. यावेळी ट्रान्सफॉर्मरला बांधलेले लाकडी दांडे धडधाकट तरुणांनी खांद्यावर पेलून ट्रान्सफॉर्मर हळूहळू पुढे ढकलत नेला. गाव उंचावर असल्याने ट्रान्सफॉर्मर जागेवर पोहोचवण्यासाठी ग्रामस्थांना बराच घाम गाळावा लागला. चिखल तुडवत आणि रानवाट कापत नियोजित ठिकाणी येताच ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600