जिल्हा

१ जुलैपर्यंत नोंदणी झालेले मतदार मतदानास पात्र

महापालिका निवडणुकांसाठी सज्ज रहा!, आयोगाचे निर्देश ठाणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला निवडणूक आयोग लागले असून आज ऑनलाईन पद्धतीने आढावा घेऊन सज्ज राहण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग रचना तयार करण्याचे काम काल संपले असून आता निवडणूक घेण्यासाठी कसे नियोजन असावे याचा आढावा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त श्री. वाघमारे यांनी विडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. या निवडणुकीतील मतदार संख्या, मतदार यादी, मतदान केंद्र, लागणारे मनुष्यबळ, इलेक्ट्रिक मतदान यंत्रांची उपलब्ध संख्या याचा आढावा घेण्यात आला. या निवडणुकीकरिता १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांना मतदानात भाग घेता येणार आहे. त्याचा आढावा निवडणूक आयुक्तानी घेतला. प्रत्येक जिल्ह्यात किती मतदार असतील, त्याला किती मतदान यंत्रांची आवश्यकता आहे, याची माहिती त्यांनी घेऊन आगामी निवडणुकीकरिता सज्ज राहण्याच्या सूचना देखिल करण्यात आल्या. निवडणूक पारदर्शक व्हावी, कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देखिल त्यांनी या बैठकीत केल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बहुसदस्य पद्धतीने होणार असल्याने मतदान केंद्रांची संख्या वाढणार असल्याने मतदान यंत्रांची संख्या देखिल वाढणार असल्याचे निवडणूक आयुक्त श्री. वाघमारे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600