जिल्हा

उल्हास नदी किनाऱ्यावरील गावांना इशारा

उल्हास नदी किनाऱ्यावरील गावांना इशारा
उल्हास नदी किनाऱ्यावरील गावांना इशारा फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरासह उल्हासनदी खोऱ्यातील आजूबाजूच्या परिसरात गेल्या २४ तासापासून परिसरात पाऊस सुरु आहे. अधून मधून जोरदार पाऊस कोसळत असल्याने काही सखल भागात पाणी साचले आहे. उल्हास नदी मोहिली परिसरात पाणी दुथडी भरून वाहत असून मोहिली, आणि म्हारळ परिसराला जोडणारा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदी किनारी राहणाऱ्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी देत उल्हासनदी पाणी पातळी वाढ पाहता मोहिली म्हारळला जोडणाऱ्या पूलावरील वाहतूक बंद करणार असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600