जिल्हा
विमानतळ नामकरणाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ-दशरथ पाटील
विमानतळ नामकरणाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ-दशरथ पाटील
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती नामकरण कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत पुढील काय कार्यवाही राहील याबाबत चर्चा करण्यासाठी कृती समितीद्वारे वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट असोसिएशनमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी ही माहिती दिली.
नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि बा पाटील यांच्या नावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संमती दिल्याने दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून त्यासाठी तीन महिने कालावधी लागणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबर रोजी आश्वासन दिले होते. त्यासाठी राज्य शासनातर्फे जो नवीन मसुदा तयार केला जाणार आहे, तो कसा असेल? याची माहिती जाणून घेण्यासाठी व हा मसुदा लवकरात लवकर पाठवण्याची विनंती करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेऊ. या भेटीनंतर कृती समितीची आणखी एक बैठक घेऊन विमानतळ नामकरणाबाबत पुढील दिशा ठरवली जाईल, असेही पाटील यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600