महाराष्ट्र
मालगाडी घसरल्याने पश्चिम रेल्वेला फटका
पालघर: पालघर रेल्वे स्थानकात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मालवाहू गाडी रुळावरून घसरल्याने मुंबई-सुरत मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
पालघर रेल्वे स्थानकातच मालगाडीचे डबे रुळावरुन घसरल्याने पश्चिम रेल्वेला त्याचा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेची मुंबई दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी वाहतूक सेवा उशिराने सुरु होती.
फलाट क्रमांक दोनवरुन चारवर क्रॉसिंग करताना रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले. त्यामुळे मुंबईच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीला त्याचा मोठा फटका बसला. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. अपघातग्रस्त मालगाडी स्टील कॉइल घेऊन मुंबईच्या दिशेने जात होती.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600