महाराष्ट्र
जनकल्याण कार्ड योजनेला महिला भगिनींची उसळली गर्दी
आ. संजय केळकर यांची अनोखी भेट
ठाणे : ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या महिला विकास परिवार या संस्थेच्या माध्यमातून 1सप्टेंबर रोजी सुरू केलेल्या जनकल्याण कार्ड योजनेला उदंड प्रतिसाद मिळत असून रविवारी महाजन वाडी, खारकर आळी येथे झालेल्या कार्यक्रमात या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची तुडुंब गर्दी उसळली होती.
या योजनेंतर्गत ज्या महिलांकडे हे कार्ड असेल त्यांना यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या दुकानांमध्ये खरेदी केल्यास खरेदीवर 15 ते 50 टक्केपर्यंत सुट मिळणार आहे.
आ. केळकर यांनी या "जनकल्याण कार्ड" चे वाटप दुसऱ्या टप्प्यात काल ठाण्याच्या महाजन वाडी हॉलमध्ये केले. महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार, उमेश चोणकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जवळ जवळ दोन हजार महिलांना काल जनकल्याण कार्डचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, व्यापारी आघाडीचे मितेश शाह उपस्थित होते.
आ. केळकर यांनी माता भगिनींशी संवाद साधताना प्रथम सर्वांना कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जनकल्याण कार्डची माहिती दिली. महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण हा आमचा महत्वाचा उद्देश आहे. आमच्या महिला विकास परिवार संस्थेच्या माध्यमातून अनेक महिला बचत गटांना आम्ही रोजगार देत असतो. मुलींना स्वरक्षणाचे धडे देत आहोत. महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे काम महिला विकास परिवार करत आहे. दीड हजारच्या वर मुलीना संगणक प्रशिक्षण दिले आहे. पुढील काळात अनेक भागात कार्यक्रम घेऊन जनकल्याण कार्डचे वाटप करणार असल्याचे आ. केळकर यांनी बोलताना सांगितले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600