जिल्हा
झी टिव्हीचा विजयी 'शो'; ग्रामीण पोलिसांना 'खो'
झी टिव्हीचा विजयी 'शो'; ग्रामीण पोलिसांना 'खो'
फोटो: ठाणे वैभव
दोन शतकांनी ठाणेवैभव करंडक सामना गाजला
ठाणे: ठाणेवैभव करंडक स्पर्धेच्या क गटात सेंट्रल मैदान येथे झालेला सामना दोन्ही संघातील खेळाडूंच्या दोन शतकांनी गाजला. झी टीव्हीच्या संघाने शुक्रवारी विजयी शो सादर करत ठाणे ग्रामीण पोलिस संघाला पराभूत केले.
झी टीव्ही संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय फलंदाजांनी सार्थ ठरवत ३१ षटकांत ३०७ धावांचा डोंगर उभा केला. झी टीव्हीच्या रोहन करंदीकर याने १२ चौकार आणि एक षटकार ठोकत ५९ चेंडूंत १०२ धावा केल्या. तर आग्नेय आदी याने १३ चौकार आणि दोन षटकार ठोकत ७८ धावा केल्या. आमिर अहमद याने चार चौकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. उदयन गोयंका याने ३१ धावांचे योगदान दिले. झी टीव्ही संघाने ३१ षटकांत ३०७ धावा केल्या. ठाणे ग्रामीण पोलिस संघाच्या हितेश म्हात्रे याने ५६ धावा देत दोन गडी बाद केले तर तुषार सूर्यराव याने एक बळी घेतला.
झी टीव्ही संघाचे आव्हान ठाणे ग्रामीण पोलिस संघाला पेलता आले नाही. ३१ षटकांत पाच गड्यांच्या बदल्यात ग्रामीण पोलिसांचा डाव २६७ धावांवर आटोपला. विशेष म्हणजे ग्रामीण पोलिस संघाचा पराभव झाला असला तरी हितेश म्हात्रे याच्या १२१ धावांनी पराभवाची धार कमी केली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600