जिल्हा

सखल भागात १०२ पंप; नालेसफाईसाठी अल्टीमेटम

सखल भागात १०२ पंप; नालेसफाईसाठी अल्टीमेटम
सखल भागात १०२ पंप; नालेसफाईसाठी अल्टीमेटम फोटो: ठाणे वैभव
आयुक्तांकडून प्रभाग समितिनिहाय आढावा ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे पूर्ण करत असताना कामाचा दर्जा, कामाची गती आणि वेळेत कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, नालेसफाईची उर्वरित कामे ५ जूनपर्यत युध्दपातळीवर पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करुन आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामुग्री उपलब्ध करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी दिले. ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा प्रभाग समितीनिहाय आढावा आयुक्तांनी घेतला. या बैठकीस उपायुक्त मधुकर बोडके, दीपक झिंजाड, डॉ. मिताली संचेती, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सर्व प्रभाग समितीचे सहायक आयुक्त व कार्यकारी अभियंता उपस्थित होते. ज्या परिसरात नालेसफाईची कामे सुरू आहेत, किंबहुना ज्या ठिकाणी काम करताना अडचणी निर्माण होत असतील तर त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवावा, त्यांच्याकडून नालेसफाईबाबत ज्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचना सर्व सहायक आयुक्तांना दिल्या. ज्या-ज्या ठिकाणी सखल भाग आहेत, जेथे दरवर्षी पाणी साचते, अशा ठिकाणी जवळपास १०२ पंप बसविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचल्यास त्या ठिकाणी पंप ऑपरेटरची व्यवस्था करणे तसेच पंप बंद पडल्यास तत्काळ कार्यवाही होईल याबाबत नियोजन करावे, शहरातील संवेदनशील आणि पूरप्रवण ठिकाणी विशेष लक्ष ठेवून उपाययोजना राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नालेसफाईदरम्यान काढण्यात येणारा गाळ तातडीने उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच रेल्वे हद्दीलगत असलेल्या कल्व्हर्ट, नाले, खाडीमुख आउटलेट्सची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात तसेच ज्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासत असेल त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. नालेसफाईच्या कामांचा दैनंदिन आढावा घेऊन केलेल्या कामाचा तपशील ठेवावा, आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ लावून पाच जूनपर्यत समाधानकारक काम झाले पाहिजे, असे निर्देश त्यांनी सर्व संबंधितांना बैठकीत दिले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600