जिल्हा

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

ठाणे: ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2026 साठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी ज्या मतदारांचे यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता राज्य निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र व्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 12 प्रकारच्या ओळखपत्रापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. फक्त वोटर स्लीपच्या आधारे मतदान करता येणार नाही. वोटर स्लीपसोबत देखील खालीलपैकी एक ओळखपत्र आवश्यक आहे. मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास 12 प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), केंद्र/ राज्य शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / सार्वजनिक मर्यांदित कंपन्यांनी दिलेले फोटो ओळखपत्र, बँक पोस्ट ऑफिस यांनी फोटोसह दिलेले पासबुक, पॅनकार्ड, स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाकडील योजनेतंर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेली पेन्शनची कागदपत्रे, संसद सदस्य/ विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड, सक्षम प्राधिकाऱ्याकडील फोटोसहित अपंगत्वाचा दाखला हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. एखाद्या मतदाराने मतदारयादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600