जिल्हा

‘मताधिकार’ ॲपमध्ये आता मतदाराचा यादीतील अनुक्रमांक उपलब्ध

‘मताधिकार’ ॲपमध्ये आता मतदाराचा यादीतील अनुक्रमांक उपलब्ध
‘मताधिकार’ ॲपमध्ये आता मतदाराचा यादीतील अनुक्रमांक उपलब्ध फोटो: ठाणे वैभव
ठाणे महापालिकेच्या मागणीवर आयोगाची सकारात्मक भूमिका ठाणे: ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदार यादीतील नाव व संबंधित मतदान केंद्र शोधण्याची अधिक सोयीस्कर व वेगवान सेवा मिळावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ मोबाईल ॲप सुरू केले आहे, या ॲपमध्ये मतदार यादीतील मतदाराचा अनुक्रमांक उपलब्ध करण्याबाबतची विनंती ठाणे महानगरपालिकेने राज्य निवडणूक आयोगाला केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आयोगाने ‘मताधिकार’ ॲपमध्ये ही महत्त्वाची सु१धारणा अंमलात आणली आहे. या सुविधेमुळे मतदान प्रक्रिया जलद होण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांनी आयोगाकडे पत्रव्यवहार करून मतदारांच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या होत्या. ‘मताधिकार’ ॲपवर विधानसभा मतदारसंघ क्रमांक, मतदार यादी भाग क्रमांक, प्रभाग क्रमांक व बुथ क्रमांक उपलब्ध असले तरी मतदाराचा यादीतील अनुक्रमांक नसल्याने मतदान केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांना संपूर्ण यादी तपासावी लागणार होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता होती. ही अडचण लक्षात घेऊन आयोगाने ॲपमध्ये मतदाराचा अनुक्रमांक दर्शविण्याची सुविधा सुरू केली आहे. यामुळे मतदारांना आपले नाव यादीत पटकन सापडणार असून मतदान अधिकारी क्रमांक 1 यांनाही मतदार शोधण्यास कमी वेळ लागणार आहे. ठाणे महानगरपालिकेने केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ ॲपमध्ये अनुक्रमांक नमूद केल्याबद्दल महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी आयोगाचे आभार व्यक्त केले आहेत. यामुळे मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ व सुरळीत पार पडण्यास मोठी मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्ले-स्टोअरवरून ‘मताधिकार’ मोबाईल अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर मतदारांना आपल्या मतदार नोंदणीशी संबंधित सर्व माहिती अत्यंत सोप्या पद्धतीने मिळू शकते. अ‍ॅपमध्ये संबंधित महानगरपालिका, जिल्हा, विधानसभा अथवा प्रभाग यासारखे मूलभूत तपशील भरल्यानंतर मतदाराचे मतदान केंद्र, EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक, मतदान केंद्राचा संपूर्ण पत्ता, मतदानाचा दिनांक व वेळ यासह आवश्यक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. या ॲपमध्ये आता मतदाराचा मतदार यादीतील अनुक्रमांक देखील उपलब्ध होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मतदारांना घरबसल्या आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल लोकशाही प्रक्रियेला अधिक सक्षम बनवणारे ठरणार असल्याचे मत प्रशासनाने व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600