जिल्हा
ठाण्यातून मोदींच्या सभेसाठी नवी मुंबईकडे दीडशे बस रवाना होणार
ठाण्यातून मोदींच्या सभेसाठी नवी मुंबईकडे दीडशे बस रवाना होणार
फोटो: ठाणे वैभव
ठाणे : बुधवार 8 ऑक्टोबर रोजी उलवे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी पनवेल आणि कल्याण, भाईंदर, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणाहून कार्यकर्ते उत्साहाने सहभाग घेणार आहे. यासाठी ठाणे शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भव्य बैठक जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत सुमारे 400 कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीतर्फे ठाणे शहरातून 33 प्रभागातून जवळपास 150 बसेस या उलवे पनवेल येथे जाणार आहेत. शहरातील कोपरी, वागळे, इंदिरानगर, लोकमान्य नगर, ज्ञानेश्वर वैती वाडी, वर्तक नगर, शिवाई वसंत विहार, ओवळा, ब्रह्मांड बाळकुम, मानपाडा, राबोडी, वृंदावन पाचपाखाडी, नौपाडा, कळवा पूर्व, कळवा पश्चिम, मुंब्रा, कौसा, दिवा या 18 मंडळातून कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून सर्व नगरसेवक जिल्हा पदाधिकारी मंडळ अध्यक्ष पॅनल प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख या सर्वांनी हिरीरीने यामध्ये सहभाग घेतला आहे. यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये सचिन पाटील, राजेश मढवी, समीरा भारती, विक्रम भोईर, तृप्ती पाटील, गौरव सिंग, भास्कर बैरी शेट्टी या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600