जिल्हा

आठ दिवसांत १५२४ होर्डिंग्ज हटविले, पाचजणांवर गुन्हे

आठ दिवसांत १५२४ होर्डिंग्ज हटविले, पाचजणांवर गुन्हे
आठ दिवसांत १५२४ होर्डिंग्ज हटविले, पाचजणांवर गुन्हे फोटो: ठाणे वैभव
ठाणे महापालिकेची धडक मोहीम ठाणे : ठाणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स आणि होर्डिंग्जविरोधात महापालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली. महापौर आणि आयुक्तांच्या निर्देशानुसार १३ ते २० जुलै या आठ दिवसांच्या मोहिमेत तब्बल १५२४ अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स व होर्डिंग्ज हटविण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पाच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तीन हात नाका येथील पादचारी पुलावर लावण्यात आलेला अनधिकृत वाढदिवसाचा बॅनर १३ जुलै रोजी कोसळल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार सर्व प्रभाग समिती हद्दीत कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान विनापरवानगी जाहिराती उभारणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत महापालिकेने फौजदारी कारवाईही केली. त्यानुसार नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात दोन, तर दिवा प्रभाग समिती क्षेत्रात तीन अशा एकूण पाच फौजदारी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स आणि फ्लेक्समुळे शहराचे विद्रूपीकरण होण्याबरोबरच पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी, उड्डाणपूल, पादचारी पूल, चौक आणि प्रमुख रस्त्यांवर विनापरवानगी लावण्यात येणाऱ्या जाहिराती अपघातांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या अनधिकृत जाहिरातींविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. नौपाडा-कोपरी प्रभाग समिती हद्दीत ३८३, वागळे प्रभाग समितीत ११५, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती हद्दीत १७८, वर्तकनगर प्रभाग समिती हद्दीत ६६, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती हद्दीत २४०, उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात ६४, कळवा प्रभाग समिती क्षेत्रात १४२, मुंब्रा प्रभाग समिती हद्दीत ३६, दिवा प्रभाग समिती क्षेत्रात ३०० होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600