जिल्हा

‘आयएमए’ डाॅक्टरांचा सोमवारी २४ तासांचा बंद

‘आयएमए’ डाॅक्टरांचा सोमवारी २४ तासांचा बंद
‘आयएमए’ डाॅक्टरांचा सोमवारी २४ तासांचा बंद फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली : हिंसाग्रस्त वातावरणात रुग्ण सेवा देणे कठीण असल्याने डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी. अशी प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने तातडीने प्रयत्न व्हावेत. याप्रकरणातील राजकीय हस्तक्षेप दूर करण्यात यावा, या मागणीसाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने सोमवारी (ता.२० जुलै) संध्याकाळी ६ ते मंगळवारी (ता.२१ जुलै) संध्याकाळी ६ या वेळेत राज्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आयएमए’च्या या हल्ल्याप्रकरणीच्या विविध मागण्यांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घेतले नाहीतर महाराष्ट्रातील ‘आयएमए’सह विविध संघटनांचे डाॅक्टर ९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जातील, असा इशारा ‘आयएमए’चे राज्य अध्यक्ष डाॅ. संतोष कुलकर्णी, राज्य सचिव डाॅ. विक्रांत देसाई, राज्य खजिनदार डाॅ. अमोल गिते यांनी दिला आहे. शास्त्रीनगर रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. सृष्टी बाविस्कर, डाॅ. वैभव साळुंके आणि परिचारिकांना शिवसेनेचे कोपर प्रभागाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दहा दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेत रुग्णालयात येऊन एका रुग्णाला सेवा देण्यात निष्काळजीपणा केला, मुख्य डाॅक्टरांचे मोबाईल क्रमांक दिले नाही म्हणून बेदम मारहाण, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. या घटनेचे देशभर पडसाद उमटले. म्हात्रे आणि त्यांचे साथीदार अक्षय कारंडे, रमेश पवार, प्रमोद निकम यांच्यावर कठोर कारवाईची भूमिका शासन, खासगी सेवेतील डाॅक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. म्हात्रे यांचा गुन्हा अजामिनपात्र असुनही त्यांना जामीन मिळाल्याने राज्यभरातील डाॅक्टर, नागरिकांमध्ये संताप आहे. आयएमए महाराष्ट्र शाखेची गुरुवारी रात्री अडिच तास बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रासह देशभरातील ५०० हून अधिक डाॅक्टर, परिचारिका सहभागी झाले होते. म्हात्रेंनी डाॅक्टरांना केलेल्या मारहाणीविषयी ५० हून अधिक प्रमुख डाॅक्टरांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करून शासनाने याप्रकरणात ठोस भूमिका घेण्याची आणि शास्त्रीनगर रुग्णालयातील नगरसेवकासह इतर आरोपींना कठोर शिक्षा होईल यादृष्टीने कारवाईची करण्याची मागणी केली. रमेश म्हात्रेंची कृती संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरील हल्ला असल्याने त्या दंडशक्तीचा निषेध करण्यासाठी ‘आयएमए’ने सोमवारी संध्याकाळी ६ ते मंगळवारी संध्याकाळी ६ वेळेत राज्यभरातील आपली वैद्यकीय सेवा पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निषेध आंदोलनादरम्यान सर्व बाह्य रुग्ण सेवा बंद राहतील. नियोजित शस्त्रक्रिया, वैद्यकीय सेवा बंद राहतील. आपत्कालीन कक्ष, अतिदक्षता विभाग, प्रसूती सेवा,जीवनावश्यक यावेळी सुरू राहतील. या आंदोलनात ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी डाॅक्टर, परिचारिका, इतर संलग्नित वैद्यकीय संघटना सहभागी असणार आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600