जिल्हा

नगरसेविका दर्शना म्हात्रे यांच्या अपात्रतेसाठी आयुक्तांकडे अर्ज

नगरसेविका दर्शना म्हात्रे यांच्या अपात्रतेसाठी आयुक्तांकडे अर्ज
नगरसेविका दर्शना म्हात्रे यांच्या अपात्रतेसाठी आयुक्तांकडे अर्ज फोटो: ठाणे वैभव
ठाणे : ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक २८-ब येथील शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान नगरसेविका दर्शना म्हात्रे यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम १० (१डी) अंतर्गत अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या ज्योती पाटील यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार सादर केली आहे. तक्रारीनुसार, नगरसेविका दर्शना म्हात्रे यांनी २०२६ च्या महानगरपालिका निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पतीच्या नावावरील कथित अनधिकृत बांधकामाची माहिती जाणीवपूर्वक लपविल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित अनधिकृत बांधकामाच्या नोंदी महापालिकेच्या दप्तरी तसेच स्ट्रक्चर ओनर म्हणून त्यांच्या पतीच्या नावावर असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदारांनी असा आरोप केला आहे की, निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात या बांधकामाचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत आवश्यक असलेली माहिती दडपण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात तक्रारदारांनी नगरसेविकेच्या पतीच्या नावावरील कथित अनधिकृत बांधकामासंदर्भातील अधिकृत कागदपत्रे, तसेच निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत जोडल्याचा दावा केला आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून चौकशीअंती आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच नगरसेविका दर्शना म्हात्रे यांना अपात्र घोषित करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तसेच या तक्रारीवर करण्यात आलेल्या कारवाईची लेखी माहिती देण्याचीही मागणी तक्रारदारांनी केली आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600