जिल्हा

मीरा-भाईंदर परिवहन सेवेत ऑगस्टमध्ये २५ इलेक्ट्रिक बस

मीरा-भाईंदर परिवहन सेवेत ऑगस्टमध्ये २५ इलेक्ट्रिक बस
मीरा-भाईंदर परिवहन सेवेत ऑगस्टमध्ये २५ इलेक्ट्रिक बस फोटो: ठाणे वैभव
भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेत पीएमई बस योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसपैकी पहिल्या टप्प्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २५ बस दाखल होणार आहेत. त्यामुळे शहरातील गर्दीच्या मार्गांवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मीरा-भाईंदर महापालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा असून ती सध्या खासगी कंत्राटदारामार्फत चालवली जाते. पालिकेकडे सध्या ७४ डिझेल व ५७ इलेक्ट्रिक अशा एकूण १३१ बस आहेत. मात्र, परिवहन सेवेचा दररोज एक लाखांहून अधिक प्रवासी वापर करत असल्याने उपलब्ध बस अपुऱ्या पडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने केंद्र शासनाकडे पीएमई बस योजनेअंतर्गत लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या आणखी १०० इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्यात २५ बस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेला मिळणार आहेत. उर्वरित बस दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने आवश्यक तयारी सुरू केली असून नव्या बस सेवेसाठी चालक व वाहकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन ताफ्यातील डिझेल बसना १० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने त्या टप्प्याटप्प्याने सेवेतून बाद होणार आहेत. तसेच शहरातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता किमान ३२० बसगाड्यांची आवश्यकता असल्याचे परिवहन विभागाचे मत आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600