जिल्हा

मराठी ग्रंथ संग्रहालयात उभारणार अत्याधुनिक मिनी नाट्यगृह

मराठी ग्रंथ संग्रहालयात उभारणार अत्याधुनिक मिनी नाट्यगृह
मराठी ग्रंथ संग्रहालयात उभारणार अत्याधुनिक मिनी नाट्यगृह फोटो: ठाणे वैभव
ठाणे: मराठी ग्रंथ संग्रहालयातील वा. अ. रेगे सभागृह अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा मिनी नाट्यगृहाच्या स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे. साहित्यप्रेमी, रंगकर्मी, कलाकार आणि रसिकांच्या सततच्या वर्दळीने गजबजलेल्या या संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावरील सुमारे २०० आसनक्षमतेच्या वा. अ. रेगे सभागृहाला आता संपूर्णपणे आधुनिक स्वरूप प्राप्त होणार आहे. नाटक, प्रायोगिक रंगभूमी, नृत्याविष्कार, संगीत मैफिली, व्याख्याने, साहित्यिक कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम अधिक प्रभावी, दर्जेदार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम पद्धतीने सादर करता यावेत, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा या नूतनीकरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या नूतनीकरणामध्ये अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था, आधुनिक प्रकाशयोजना, वातानुकूलित सभागृह, प्रशस्त व सुसज्ज रंगमंच तसेच कलाकारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व बॅकस्टेज सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. ११ जुलै रोजी या सभागृहात अखेरचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष नूतनीकरणाच्या कामाला प्रारंभ होईल. हे काम सुमारे दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, पावसाळ्यानंतर नव्या रूपातील हे अत्याधुनिक सभागृह पुन्हा एकदा रसिकांसाठी खुले होणार असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600