जिल्हा

सलग ५३ तास अति जलद स्केटिंग

सलग ५३ तास अति जलद स्केटिंग
सलग ५३ तास अति जलद स्केटिंग फोटो: ठाणे वैभव
मीरारोडच्या खेळाडूंच्या विक्रमाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली नोंद कल्याण: बेळगावमधील शिवगंगा स्टेडियममध्ये पार पडलेल्या सलग 53 तास 100 मिटर अति जलद स्केटिंग चालवण्याचा आगळा वेगळा विक्रम खेळाडूंनी केला आणि विशेष म्हणजे हा विक्रम दोन चाकावर स्केटिंग करुन केला आहे. मीरारोडच्या 33 खेळाडूंनी भाग घेऊन हा पराक्रम केला. या विक्रमाची नोंद गिनिज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशांमधून 900 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत यश मिळविलेले सर्व खेळाडू संतोष मिश्रा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सराव करतात. हा विक्रम करणाऱ्यांमध्ये प्रियांश पठारे, रुद्र कदम, श्रवंती सतीश, अन्विता बुटे, ध्रुविका रावराणे, रोशन कोसंबिया, रोनक कोसंबिया, आकृती झा, ह्रिद्या देशमुख, अलिशबा शेख, दव विश्वकर्मा, अर्जित जोयशी, कियान पटेल, श्रीरक्षा श्रीकृष्ण मूर्ती, सात्विका श्रीकृष्ण मूर्ती, शौर्य गोहिल, हीत राठोड, हमजा खान, उमर खान, मोहम्मद खान, वेदांत शिंदे, श्लोक पाटील, सबा कादर, जियान प्रजापती, जियाना शेट्टी, मालविका बाईंग, हदिबा दुंगे, अजमत दुंगे, आध्या बिहारी, ट्विशा झवेरी, हर्षिका रस्तोगी, अथर्व या सर्व खेळाडूंचा समावेश होता. प्रशिक्षक संतोष मिश्रा यांचे या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600