जिल्हा

अवैधरित्या डम्प‍िंग करणाऱ्या वाहनांना ६० हजारांचा दंड

अवैधरित्या डम्प‍िंग करणाऱ्या वाहनांना ६० हजारांचा दंड
अवैधरित्या डम्प‍िंग करणाऱ्या वाहनांना ६० हजारांचा दंड फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कोलशेत परिसरात अवैधरित्या डेब्रीजचे डम्पिंग करणाऱ्या वाहनांवर आज कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान संबंधित वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोलशेत परिसरात काही वाहनांकडून अनधिकृतपणे डेब्रीज टाकण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिकेला प्राप्त झाली होती. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने संबंधित ठिकाणी पाहणी करून कारवाई केली. अवैध डम्पिंगमुळे परिसराच्या स्वच्छतेवर तसेच पर्यावरणावर परिणाम होत असल्याने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, अभियंता किशोर गुळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक साईराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक चारु गोटे, स्वच्छता निरीक्षक सुमित जाधव यांनी केली. यावेळी जप्त करण्यात आलेले डेब्रीज पुढील प्रक्रिया करण्यासाठी अधिकृत प्रकल्पाकडे पाठवण्यात आले. तसेच शहरात अवैधरित्या डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600