जिल्हा
बदलापूर नगरपरिषदेचे करवाढ नसलेलले ६२९ कोटींचे अंदाजपत्रक
बदलापूर नगरपरिषदेचे करवाढ नसलेलले ६२९ कोटींचे अंदाजपत्रक
फोटो: ठाणे वैभव
बदलापूर: बदलापूर नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना लेखापाल विकास चव्हाण यांनी कोणतीही करवाढ नसलेले २०२४-२५ चे सुधारित व २०२५-२६ चे अंदाजपत्रक सादर केले.
अर्थसंकल्पामध्ये एकूण जमा रुपये ६१९.५७ कोटी तसेच खर्च रुपये ६१९.५२ कोटी व शिल्लक रुपये ५.०४ लाख असून अर्थसंकल्पामध्ये कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही.
रस्ते बांधणीसाठी २.५ कोटी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना (जिल्हास्तर) ५० कोटीची तरतूद केलेली आहे तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) १०० कोटी रुपये आणि घनकचरा व्यवस्थापन ३४ कोटी रुपये आणि आपत्ती व्यवस्थापन रुपये २५ लाखांची तरतूद केलेली आहे. शहरातील नागरिकांसाठी सुचविण्यात आलेल्या विशेष तरतुदींमध्ये महिला व बालकल्याणसाठी १.३९ कोटी, दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी १.३९ कोटी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी १० लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अंतिम मंजुरीसाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600