जिल्हा

बेकायदेशीर उत्खननाप्रकरणी विकासकाला ८८ लाखांचा दंड

कल्याण : कल्याण-मुरबाड मार्गालगत म्हारळगाव येथे एका बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी बेकायदेशीरपणे उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदारांनी संबंधित विकासकाला तब्बल ८८ लाख १९,७१२ रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार बनावट कागदपत्र बनवून ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व इतरांनी आर्थिक हितसंबंध जोपासत अनियमित पद्धतीने उत्खनन करून महसूल बुडवत शासनाची फसवणूक केली असल्याचे स्पष्ट झाले. ग्राम महसूल अधिकारी अश्विनी बोरसे यांनी 3000 ब्रास उत्खनन झाल्याचे दिसून येते असा पाहणी अहवाल बनवला, परंतु तहसील कार्यालयात फक्त 200 ब्रासची स्वामित्वधन विकासकाकडून भरून घेतले, उरलेल्या 2800 ब्रासची पुन्हा तफावत करत पुन्हा महसूल बुडवले, असा आरोप जागरूक नागरिक प्रकाश साळवे यांनी केला आहे. या प्रकरणी तहसील कार्यालयातून नायब तहसीलदार व इतर अधिकारी यांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली. प्रत्यक्ष जागेवर पाहणी आणि मोजणी केली असता सादर केलेल्या मोजणीमध्ये 696 ब्रास एवढे अनधिकृतपणे अवैध उत्खनन केल्याचे दिसून आले, असे नायब तहसीलदार यांनी तहसीलदारांना अहवालाद्वारे कळवले. विनापरवाना उत्खनन झाल्याचे सिद्ध झाल्याने तहसीलदारांनी गौण खनिजे अवैध उत्खनन केल्याप्रकरणी दंड आकारून अनधिकृत उत्खनन 696 ब्रासची रक्कम व त्यावर पाचपट दंड असे एकूण 88 लाख 19 हजार 712 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600