जिल्हा
मोहने येथील वादात दोन वर्षांच्या चिमुकलीवर गुन्हा!
कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून दोन गटात झालेल्या राड्याबाबत दोन्ही गटांच्या विरोधात परस्परविरोधी गुन्हे खडकपाडा पोलिस ठाण्यात दाखल केले होते. त्यापैकी एका गटाच्या गुन्ह्यात एका दोन वर्षाच्या मुलीला आरोपी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
या घटनेत जखमी असलेल्या संध्या साठे यांनी सांगितले की, त्यांच्यासह अनेकांना एका गटाकडून मारहाण झाली. आमच्यापैकी जखमींना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींमध्ये आमच्यासोबत असलेली एक दोन वर्षाची मुलगी होती. पोलिसांनी या दोन वर्षाच्या मुलीलाही गुन्ह्यात आरोपी केले. ही बाब जेव्हा आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले तेव्हा वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
या राडा प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, त्यापैकी पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर तीन जणांना पोलिस काेठडी सुनावण्यात आली.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600