जिल्हा

नवी मुंबईत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची एकच गर्दी

नवी मुंबईत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची एकच गर्दी
नवी मुंबईत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची एकच गर्दी फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज भरले. त्यामुळे नवी मुंबईतील निवडणूक कार्यालयाबाहेर आज एकच गर्दी दिसून आली. नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती होईल अशी शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा असताना दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र भाजपामध्ये इच्छुक असलेल्या अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने बहुतांश इच्छुकांनी इतर पक्षांची कास धरत आपले अर्ज भरले. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे समर्थकांना सर्वात जास्त फटका बसला आहे. तब्बल १३ इच्छुकांकडे पक्षाचे ए बी फॉर्म होते. मात्र त्यावर जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश पाटील यांची सहीच नसल्याने त्यांची उमेदवारी डावलली गेली हे स्पष्ट होताच या इच्छुकांना धक्काच बसला. यावर आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील मंत्री गणेश नाईक यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी मिळत नाही असे समजल्यावर अनेकांनी राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे आपले उमेदवारी अर्ज भरले. त्यामुळे नवी मुंबई शहरात दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600