जिल्हा

ठेकेदाराला ५० लाखांचा 'खड्डा'!

ठेकेदाराला ५० लाखांचा 'खड्डा'!
ठेकेदाराला ५० लाखांचा 'खड्डा'! फोटो: ठाणे वैभव
* कासारवडवली उड्डाणपुलावरील रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे * एमएमआरडीएकडून जे. कुमार कंपनीला दंड आनंद कांबळे/ठाणे घोडबंदर मार्गांवरील नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरील रस्त्यावर पडलेले खड्डे ठेकेदाराला भोवले असून एमएमआरडीएने निकृष्ट दर्जाच्या कामाचा ठपका ठेऊन ५० लाखांचा दंड ठोठवाला आहे. घोडबंदरकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी या मार्गावरील कासारवडवली नाका येथे उड्डाणपूल बांधण्यात आला असून करोडो रुपयाचा ठेका जे कुमार या ठेकेदाराला देण्यात आला आहे. या ठिकाणी दोन टप्प्यात हा पूल बांधण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील ठाण्याकडून घोडबंदर मार्गकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे उद्घाटन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ७ जुलै रोजी झाले होते. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत या मार्गाच्या प्रारंभीच नवीन रस्त्यावर खड्डा पडला होता. तसेच पुलाला देखिल तडा गेल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या लक्षात आल्यानंतर त्याची दखल घेऊन एमएमआरडीएला या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एमएमआरडीएने ठेकेदाराला ५० लाखांचा दंड ठोठावला असल्याचे महापालिका आयुक्त श्री.जेराव यांना कळवले आहे. ज्या ठिकाणी खड्डा पडला होता त्या भागात अस्फाल्टचा वापर करुन रस्त्यावरील खड्डा भरून हा रस्ता चकाचक करण्यात आला आहे. घोडबंदर मार्गांवरील वाहतूक कोंडी आणि रस्त्याच्या कामामुळे घोडबंदरवासी आधीच हैराण असून वाहतूक कोंडीतून सुटका झालेल्या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाले असून पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत. उप मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करण्याचे आदेश दिले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या ठेकेदाराच्या विरोधात ५० लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आली असल्याचे एका अधिकाऱ्याने 'ठाणेवैभव'ला सांगितले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600