जिल्हा

सँडविच विक्रेत्याचा पालिका अधिकाऱ्यावर हल्ला

सँडविच विक्रेत्याचा पालिका अधिकाऱ्यावर हल्ला
सँडविच विक्रेत्याचा पालिका अधिकाऱ्यावर हल्ला फोटो: ठाणे वैभव
डोंबिवली: एमआयडीसी विभागातील पेंढारकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली आहे. पालिकेच्या अतिक्रमण कारवाई पथकातील अधिकाऱ्याला कारवाई करताना मारहाण करण्यात आली आहे. अतिक्रमण विरोधात कारवाई करत असताना एका सँडविच विक्रेत्याने अधिकाऱ्यावर बांबूने हल्ला केला असल्याचे समोर येत आहे. पालिका अधिकारी सुरेश कामराज जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच शहरात खळबळ उडाली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पेंढारकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक गेले होते. यावेळी कारवाईला विरोध करत तेथील एका सँडविच विक्रेत्याने लागलीच अधिकाऱ्यावर हल्ला केला. बांबूने मारहाण केल्यामुळे कामराज हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा नागरिकांनी निषेध केला असून फेरीवाल्यांच्या अशा वाढत्या दादागिरीवर ताबडतोब इलाज करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी संबंधित विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600