जिल्हा
भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग
भिवंडी : तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील देशमुख कंपाउंड येथे केमिकल गोदामाला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या आगीत गोदामात साठवण्यात आलेला लाखो रुपयांचा घातक रासायनिक साठा जळून खाक झाला आहे.
या आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी गाड्यांसह दाखल होऊन या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र केमिकलच्या गोदामात असलेल्या काही ज्वालाग्राही घातक केमिकलमुळे अग्नी रौद्ररूप धारण केले. या आगीत लाखो रुपयांचे केमिकलचे ड्रम जळून खाक झाले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600