भारतीय जनता पक्षातर्फे तेजश्री करंजुले-पाटील यांनी नगराध्यक्षा पदासाठी अर्ज सादर केला. माजी आमदार नरेंद्र पाटील, कल्याण जिल्ह्याचे नरेंद्र सूर्यवंशी, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले-पाटील, यांच्यासह जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले-पाटील यांच्यासह इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे अश्विनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किसन तारमळे, सचिन पाटील, विनोद शेलार उपस्थित होते.
काँग्रेस पक्षातर्फे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या पत्नी नूतन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. महाविकास आघाडीच्या शिवसेना (ठाकरे गट) यांच्यावतीने माजी उप नगराध्यक्षा अंजली राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी उबाठाचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या उपस्थितीत अंजली राऊत यांनी नगराध्यक्षा पदाचा अर्ज सादर केला.
भाजपासह शिवसेना शिंदे गटातर्फे इच्छुक उमेदवारांना आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ए बी फॉर्म देण्यात आल्याने वेळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चांगलीच तारांबळ करावी लागली. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना रांगेत उभे रहावे लागले होते. पक्षाकडून अधिकृत अर्ज न मिळाल्याने काही इच्छुकांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. आज होणाऱ्या गर्दीचा अंदाज आल्याने नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून उमेदवार आणि त्यांचे सूचक आणि अनुमोदक यांनाच सोडण्यात येत होते. रविवारपर्यन्त एकूण 27 उमेदवारांनी निवडणूक अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केले होते.
जिल्हा
अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी सर्वपक्षीयांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

फोटो: ठाणे वैभव
शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठातर्फे उमेदवारी अर्ज
अंबरनाथ: महायुती अथवा महाविकास आघाडी न झाल्याने अंबरनाथमध्ये नगराध्यक्षा आणि नगरसेवक पदासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गट, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज भरले.
अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची आज मंगळवारी अंतिम मुदत होती. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आज नगरपालिका कार्यालय आणि परिसरात अभूतपूर्व गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रण करताना पोलीस यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागली. सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज घेण्यास सुरुवात करण्यात आली, त्यापूर्वीच इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या उपस्थितीने पालिका कार्यालय गजबजून गेले होते.
नगराध्यक्षा पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना आणि भाजपातर्फे ढोल-ताश्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत शहराच्या प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. शिवसेना (शिंदे गट) तर्फे नगराध्यक्षा पदासाठी माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षातर्फे तेजश्री करंजुले-पाटील यांनी नगराध्यक्षा पदासाठी अर्ज सादर केला. माजी आमदार नरेंद्र पाटील, कल्याण जिल्ह्याचे नरेंद्र सूर्यवंशी, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले-पाटील, यांच्यासह जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले-पाटील यांच्यासह इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे अश्विनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किसन तारमळे, सचिन पाटील, विनोद शेलार उपस्थित होते.
काँग्रेस पक्षातर्फे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या पत्नी नूतन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. महाविकास आघाडीच्या शिवसेना (ठाकरे गट) यांच्यावतीने माजी उप नगराध्यक्षा अंजली राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी उबाठाचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या उपस्थितीत अंजली राऊत यांनी नगराध्यक्षा पदाचा अर्ज सादर केला.
भाजपासह शिवसेना शिंदे गटातर्फे इच्छुक उमेदवारांना आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ए बी फॉर्म देण्यात आल्याने वेळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चांगलीच तारांबळ करावी लागली. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना रांगेत उभे रहावे लागले होते. पक्षाकडून अधिकृत अर्ज न मिळाल्याने काही इच्छुकांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. आज होणाऱ्या गर्दीचा अंदाज आल्याने नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून उमेदवार आणि त्यांचे सूचक आणि अनुमोदक यांनाच सोडण्यात येत होते. रविवारपर्यन्त एकूण 27 उमेदवारांनी निवडणूक अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केले होते.
भारतीय जनता पक्षातर्फे तेजश्री करंजुले-पाटील यांनी नगराध्यक्षा पदासाठी अर्ज सादर केला. माजी आमदार नरेंद्र पाटील, कल्याण जिल्ह्याचे नरेंद्र सूर्यवंशी, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले-पाटील, यांच्यासह जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले-पाटील यांच्यासह इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे अश्विनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किसन तारमळे, सचिन पाटील, विनोद शेलार उपस्थित होते.
काँग्रेस पक्षातर्फे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या पत्नी नूतन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. महाविकास आघाडीच्या शिवसेना (ठाकरे गट) यांच्यावतीने माजी उप नगराध्यक्षा अंजली राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी उबाठाचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या उपस्थितीत अंजली राऊत यांनी नगराध्यक्षा पदाचा अर्ज सादर केला.
भाजपासह शिवसेना शिंदे गटातर्फे इच्छुक उमेदवारांना आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ए बी फॉर्म देण्यात आल्याने वेळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चांगलीच तारांबळ करावी लागली. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना रांगेत उभे रहावे लागले होते. पक्षाकडून अधिकृत अर्ज न मिळाल्याने काही इच्छुकांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. आज होणाऱ्या गर्दीचा अंदाज आल्याने नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून उमेदवार आणि त्यांचे सूचक आणि अनुमोदक यांनाच सोडण्यात येत होते. रविवारपर्यन्त एकूण 27 उमेदवारांनी निवडणूक अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केले होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600