जिल्हा

पादचारी पुलांवर लिफ्ट; अन् १५ कोटींचे उत्पन्न!

पादचारी पुलांवर लिफ्ट; अन् १५ कोटींचे उत्पन्न!
पादचारी पुलांवर लिफ्ट; अन् १५ कोटींचे उत्पन्न! फोटो: ठाणे वैभव
ठामपा कंत्राटदारामार्फत राबवणार योजना ठाणे: ठाणे महापालिकेने पाच पादचारी पुल उभारले असून या पुलांवर ज्येष्ठ नागरीक व दिव्यांगांना ये-जा करणे सोईचे व्हावे, याकरीता या पुलांच्या ठिकाणी लवकरच (उद्वाहन) लिफ्टची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. ही काम कंत्राटदारामार्फत करण्यात येणार असून त्या बदल्यात जाहिरातींचे हक्क देण्यात येणार आहेत. यातून महापालिकेला १५ वर्षांत १५ कोटींचे उत्पन्नही मिळणार आहे. मे. ऊर्जा ब्युटीफिकेशन या ठेकेदारामार्फत संचलन व निगा देखभालीसह लिफ्ट उभारण्याचे जाहिरात विभागाने ठरवले आहे. या पुलांवर १५ वर्षे जाहीरात प्रदर्शनाच्या हक्काच्या मोबदल्यात ठेकेदार पालिकेला १५ कोटींचे उत्पन्न देणार आहे. सद्यस्थितीत हा प्रस्ताव पालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी प्रस्तावित असून आगामी पालिका निवडणूकीआधी हा उपक्रम मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार असल्याचे पालिकेतील सुत्रांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका क्षेत्रात वाढत्या नागरीकरणाबरोबरच वाहने वाढत असून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सुलभ व्हावे, याकरीता रस्त्यांवर पादचारी पुल उभारले आहेत. पूर्वद्रुतगती महामार्गावरील घोडबंदर रोडवर आनंद नगर, विहंग हॉटेल, विवियाना मॉल, आर मॉल तसेच, कळवा खारीगाव रेल्वे फाटक येथील पाच पादचारी पुलांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरीक, महिला आणि दिव्यांग यांना पुलावरून मार्गक्रमण करण्यासाठी या पुलांवर लिफ्टकरीता डक्ट उभारण्यात आले. मात्र लिफ्टची सुविधाच उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांची होणारी ही आबाळ लक्षात घेऊन पुलांच्या ठिकाणी लिफ्ट बसवण्यासाठी अखेर पालिकेला मुहूर्त सापडला आहे. त्यानुसार १५ वर्षे जाहीरात प्रदर्शनाच्या हक्काच्या मोबदल्यात या पादचारी पुलांवर दोन्ही बाजुस लिफ्ट बसवून, संचलन व निगा देखभाल करण्याचे कंत्राट मे. उर्जा कंपनीला देण्याचे पालिकेने ठरवले आहे. प्रती पुलासाठी १००० चौरस फुट जाहीरात प्रदर्शन हक्क मिळवून हा ठेकेदार वर्षाला एक कोटी रुपये यानुसार १५ कोटी जाहिरात प्रदर्शनापोटी पालिकेला देणार असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600