जिल्हा
स्व. अजित पवार यांच्या आवडीच्या गीतांमधून आदरांजली
स्व. अजित पवार यांच्या आवडीच्या गीतांमधून आदरांजली
फोटो: ठाणे वैभव
ठाण्यात २२ जुलै रोजी कार्यक्रम
ठाणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव डावखरे फाउंडेशन यांच्या वतीने त्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांच्या स्मृतींना शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रबोध वसंतराव डावखरे यांनी ठाण्यात २२ जुलै रोजी गडकरी रंगायतनमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका व संगीतकार वैशाली सामंत यांच्यासह कलाकारांकडून विविध गीते सादर केली जातील.
वसंतराव डावखरे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध डावखरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वीरू वाघमारे यांची उपस्थिती होती.
प्रबोध डावखरे म्हणाले`दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ठाण्याबरोबर ऋणानुबंध होते. अजितदादांचा शिस्तप्रिय स्वभाव, प्रशासनाचे सखोल ज्ञान आणि त्यांना सामान्यांविषयी आत्मियतेचा धागा होता. त्याचबरोबरच राज्याच्या सांस्कृतिक, कला, नाट्य क्षेत्रातही त्यांना विशेष रुची होती. त्याअनुषंगाने वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम सादर केला जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून अजितदादांना आवडणाऱ्या गीतांची माहिती घेऊन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गडकरी रंगायतनमध्ये २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अजितदादांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाईल.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600