जिल्हा

आधी बंडखोरांवर कारवाई; नंतर महासभेची लगीनघाई

आधी बंडखोरांवर कारवाई; नंतर महासभेची लगीनघाई
आधी बंडखोरांवर कारवाई; नंतर महासभेची लगीनघाई फोटो: ठाणे वैभव
* महायुतीतील बंडखोर झाले सक्रिय * भाजप युवा मोर्चा करणार मुख्यालयाबाहेर आंदोलन ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत पक्षविरोधी काम केले होते. त्यांच्यावर कारवाई न झाल्याने बंडखोर पुन्हा पक्षांमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करत भाजप युवा मोर्चाने महासभेला विरोध केला असून मुख्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांच्या गटनेत्यांना यासंदर्भात निवेदन देखील दिले आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणारे महायुतीतील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्ते पुन्हा पक्षात सक्रिय झाल्याने ठाण्यातील भाजप युवा मोर्च्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम केले असल्याचा भाजप युवा मोर्चाचा आरोप आहे. याशिवाय विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे काम देखील निवडणुकीदरम्यान काही कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा युवा मोर्च्याच्या वतीने करण्यात आला आहे. अशा कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्याचे आदेश यापूर्वीच दिले असताना अद्याप त्यांचे निलंबन झाले नाही. याउलट हे सर्व कार्यकर्ते पुन्हा पक्षात सक्रिय झाल्याने दोन्ही पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी आता भाजप युवा मोर्चा आक्रमक झाली असून बुधवारी त्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर काही वेळ निषेध आंदोलन देखील केले. तर कारवाईसाठी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप गटनेते मुकेश मोकाशी आणि शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांची भेट घेत बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली नाही तर महासभेला विरोध करत पालिका मुख्यालयाच्या बाहेरच ठिय्या देण्याचा इशारा युवा मोर्चाने दिला आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600