बदलापूर : रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदासाठी ॲड. तुषार साटपे यांची एकमताने निवड करण्यात आली तर क्लब सेक्रेटरीपदी श्रीकृष्ण मचगर, खजिनदार पदावर हेमंत यशवंतराव यांची निवड करण्यात आली.
विमल हॉल, म्हाडा कॉलनी येथील सभागृहात त्यांचा पदग्रहण सोहळा झाला. यावेळी क्लबचे सर्व सदस्य तथा रोटरी जिल्हा प्रांतपाल डॉ निलेश जयवंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदग्रहण समारंभ पार पडला. रोटरी जिल्हा 3142 मधील अनेक पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते .
मावळत्या अध्यक्ष नीतू नायर यांनी ऍड. साटपे यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली. जिल्हा प्रांतपाल डॉ.निलेश जयवंत यांनी ॲड. तुषार साटपे यांनी एक जुलै रोजी केलेल्या सुमारे 11 प्रकल्पाचे कौतुक केले.
बदलापूरसाठी रोटरी क्लब बदलापूर स्मार्ट सिटीतर्फे जुन्या सायकली द्या, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विज्ञान दिन, नगरपालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांना एआयबाबत माहिती असे अनेक उपक्रम येत्या वर्षात राबवू व क्लबचे हे वर्ष फ्रेंडशिप व फेलोशिप वर्ष असेल, असे नवंनिर्वाचित अध्यक्ष ॲड तुषार साटपे यांनी नमूद केले.
मावळते अध्यक्ष नीतू नायर यांनी निवनिर्वाचित अध्यक्षांना पुढील वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर पुढील अध्यक्षांनी देखील त्यांच्याच प्रमाणे काम करून रोटरीचे व क्लबचे नाव समाजात आणि समाजोपयोगी कार्यासाठी कसे करता येईल याबद्दल सूचना दिल्या. यावेळी बोलताना तुषार साटपे यांनी पुढील वर्षात आपण समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत काम करून ज्या घटकांपर्यंत लोक पोहचत नाही त्या घटकांपर्यंत रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही पोहोचू आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करून त्यांच्या आयुष्यात बदल घडवू,असे आश्वासन त्यांनी दिले.
बदलापूरचे प्रसिद्ध शाडू मूर्तिकार रवी कुंभार यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी क्लबमधील सर्व सदस्य उपस्थित होते. रोटरी संचालक मंडळावर डॉ रमेश कुर्ले, श्रीकृष्ण मजगर, हेमंत यशवंतराव, नितू नायर, डॉ सुतेजा स्वामी, डॉ. रूपाली ढवन, पुष्कर कर्णावट, राणी मिश्रा, नूरबानो मणिहार यांची निवड करण्यात आली. जिल्हा प्रांतपाल डॉ. निलेश जयवंत यांनी सर्व बीओडी सदस्यांना रोटरी पिन लाऊन त्यांचा सन्मान केला यावेळी निलेश रोठे व सीमा कदम यांनी क्लबची मेंबरशिप घेतली.
बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील, नगरसेवक प्रवीण राऊत, राजेंद्र घोरपडे, शरद तेली समाजसेवक राम लिये, आकाश साटपे तसेच बदलापुरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुतेजा स्वामी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे डॉ. रमेश कुर्ले यांनी केले.