जिल्हा

भिवंडीत श्री पंढरीनाथ देवस्थानाचे सामाजिक उपक्रम

भिवंडीत श्री पंढरीनाथ देवस्थानाचे सामाजिक उपक्रम
भिवंडीत श्री पंढरीनाथ देवस्थानाचे सामाजिक उपक्रम फोटो: ठाणे वैभव
भिवंडी : भिवंडी शहरात ३३८ वर्षे जुने ऐतिहासिक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भक्तगणांसाठी खिचडीच्या प्रसादासह आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. ३० जुलै २०२६ पर्यंत मंदिरात महाआरती आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
शहरातील वाणीआळीत असलेल्या श्री पंढरीनाथ देवस्थान वैश्य समाज यांचे सुमारे ३३८ वर्षे जुने ऐतिहासिक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून काल आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात दिवसभर भाविकांची रीघ होती. दर्शनासाठी आलेल्या भक्तगणांसाठी देवस्थानामार्फत उपवासाची खिचडी प्रसाद दिला जात होता. गुरुपौर्णिमेपर्यंत हरिनाम सप्ताहाचे आयोजन केल्याची माहिती देवस्थानाचे सरपंच यांनी दिली. तर भिवंडी महानगरपालिकेच्या नगरसेविका रोमा आळशी यांनी महापालिकेमार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करून टीबी आजाराची माहिती देत छातीचा एक्सरे काढण्याची देखील सोय उपलब्ध केल्याने भाविकांनी याचा लाभ घेतला. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात देखील भाविकांनी परिसरातील मंदिरांत जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600