जिल्हा
आंबेडकरेट यूनाइटेड अलायन्सचा अविनाश जाधव यांना पाठिंबा
ठाणे : मनसेचे ठाणे शहर मतदारसंघाचे उमेदवार अविनाश जाधव यांना सुनील खांबे यांच्या आंबेडकरेट यूनाइटेड अलायन्सने अविनाश जाधव यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून मनसेचे अविनाश जाधव जोमाने रिंगणात उतरले आहेत. जाधव यांनी ठाणे शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांची विजयाच्या मार्गाने वाटचाल सुरु आहे. जिकडे अन्याय तिकडे अविनाश जाधव धावून जातात हे ठाण्याने बघितले असल्याचा यावेळी खांबे यांनी सांगितले. ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीत तसेच समस्येला तोंड देण्यासाठी अविनाश जाधव नेहमीच तत्पर असून त्यांच्या प्रचाराने विरोधकांमध्ये धडकी भरली असल्याचे मत सुनील खांबे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे, डी.सी. पाटील, संदीप खांबे आदी जण उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600