जिल्हा
सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि महिलाध्यक्ष सुजाता घाग यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी पत्र दिले आहे.
काल सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर व्यंगात्मक टीका केली होती. या टीकेच्या अनुषंगाने ही तक्रार करण्यात आली आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्रक्रियेबाबत अनुचित वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या तोंडाबाबतही लाजीरवाणी विधाने करून आमच्या तसेच शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. सदाभाऊ खोत यांनी लोकांना चिथावणी देऊन शरद पवार यांच्या जीविताला धोका निर्माण करणे, जनतेची दिशाभूल करून आदर्श आचारसंहितेचा भंग करणे, तसेच आमच्या भावना दुखावणे असे प्रकार केल्याने सदाभाऊ खोत यांच्यावर संबधित प्रकरणाचे योग्य त्या कलमान्वये गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य, ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी, प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस राजेश कदम, माधुरी सोनार, कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विक्रांत घाग आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600