जिल्हा
इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळून आठ वर्षांचा मुलगा जखमी
ठाणे : वागळे इस्टेट, किसननगर नंबर २ येथील तळ अधिक तीन मजली तेलंग निवास या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग रस्त्यावरून चाललेल्या उत्कर्ष भारती (८) या मुलाच्या डोक्यावर पडला.
ही घटना रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी-कर्मचारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, वागळे प्रभाग समितीचे कर्मचारी, श्रीनगर पोलीस, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी धाव घेतली होती. इमारतीचा उर्वरित प्लास्टरही धोकादायक स्थितीत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
ही इमारत १९९० सालची असून तळ अधिक तीन मजल्याच्या या इमारतीत १२ रहिवासी आणि आठ गाळे आहेत. ही इमारत सी २ बी या प्रकारात मोडत असल्याने ही इमारत राहण्यास योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु तरीसुध्दा महापालिकेने आता या इमारत धारकांना नोटीस काढली असून इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्याचा अहवाल सादर करावा असे सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600