जिल्हा
रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेला शाळेच्या बसने चिरडले
बसचालकावर गुन्हा दाखल
डोंबिवली : एक 70 वर्षीय वृद्ध महिला रस्ता ओलांडताना शाळेच्या बसखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील केळकर रोडवर घडली. याप्रकरणी बसचालकाविरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया मराठे असे अपघातात मृत्यू पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. महिलेचा भाऊ सुधीर फडके यांच्या फिर्यादीवरून ओमकार इंटरनॅशनल शाळेचा बसचालक (एम एच ०५ ए झेड ०९६६) दिंगबर मिश्री याच्या विरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वृद्ध महिला कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर केळकर रोडवर आल्या. रस्ता ओलांडताना त्या बसखाली आल्या. केळकर रोडवरजवळील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रामनगर पोलिसांनी बसचालकाला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600