महाराष्ट्र

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अर्चना स्कूल प्रथम

किन्हवली: ठाणे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकताच ठाणे येथे पार पडले असून जिल्हा परिषद ठाणे माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ५१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक स्तर आदिवासी क्षेत्रातून अर्चना स्कूलला प्रथम क्रमांक मिळाला आहे. शेतीमध्ये संरक्षण पद्धत या विज्ञान प्रकल्पास हे पारितोषिक मिळाले आहे. मुख्य म्हणजे अर्चना ट्रस्टच्या अर्चना इंग्लिश मीडियमला शहापुरात झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील पारितोषिक मिळाले होते. अर्चना इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन हा प्रकल्प तयार केला. यासाठी त्यांच्या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले. यातूनच या शाळेच्या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600