महाराष्ट्र

इराणी टोळीतील सराईत चोरटा जेरबंद; १९ गुन्हे उघडकीस

ठाणे: ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीतील भिवंडी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवून ईराणी टोळीतील सराईत सोनसाखळी चोरट्यास सापळा रचून अटक केली. चौकशीत १९ गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून २४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अब्बास जाफरी (२३) असे या चोरट्याचे नाव आहे. ठाणे गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवंडीच्या शांतीनगर परिसरात सापळा रचून ईराणी टोळीतील सराईत आरोपीस अटक केली होती. अधिक चौकशीत आरोपीने ठाणे पोलीस आयुक्तालयात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीसह मोटार सायकल चोरी आणि मोबाईल फोन चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले. यावेळी त्याच्यावर दाखल असलेल्या १९ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्याच्यावर नारपोली, भिवंडी शहर, बदलापूर पूर्व, हिललाईन, कापूरबावडी, वर्तकनगर, कासारवडवली, मध्यवर्ती पोलीस ठाणे, चितळसर, कासारवडवली, वागळे, महात्मा फुले पोलीस ठाणे, खडकपाडा आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलीस पथकाने २३ लाख ८९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600