जिल्हा

बसस्थानके सुंदर करण्यासाठी वास्तुविशारदांनी योगदान द्यावे

बसस्थानके सुंदर करण्यासाठी वास्तुविशारदांनी योगदान द्यावे
बसस्थानके सुंदर करण्यासाठी वास्तुविशारदांनी योगदान द्यावे फोटो: ठाणे वैभव
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन ठाणे: भविष्यामध्ये एसटीची बसस्थानके बांधताना ते सुंदर आणि सुशोभित असावीत यासाठी महाराष्ट्रातील वास्तुविशारदांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यांनी एसटीच्या मोकळ्या जागेवर विकसित होत असलेल्या प्रकल्पामध्ये आपल्या सुंदर आणि कल्पक कौशल्यातुन पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकासाचे " रोल मॉडेल " तयार करावे असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते इंडियन असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट यांच्या माध्यमातून ठाणे येथे भरवलेल्या दोन दिवसांच्या संमेलनाचे उद्घाटन करताना बोलत होते. या वेळी राज्यभरात एसटीच्या जमिनीवर विकसित होणाऱ्या प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण मंत्री सरनाईक यांनी केले. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी विखुरलेल्या एसटीच्या सुमारे तीन हजार एकर जमीनीचा विकास करण्यासाठी सर्व समावेश आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यामध्ये वास्तुविशारद म्हणून आपल्या सूचना आणि प्रस्ताव दिल्यास तो आराखडा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला तयार करणे शक्य होईल. भविष्यात एसटीची सर्व बसस्थानके, आगारे ही वास्तुविशारदाच्या सौंदरदृष्टीने विकसित झालेले असतील . एसटीच्या जमीनीवर उभा राहणाऱ्या प्रकल्पामध्ये आपल्या कौशल्यपूर्ण योगदानातून निर्माण झालेल्या वास्तू येणाऱ्या पिढीला प्रेरक ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. यावेळी आमदार संजय केळकर व जितेंद्र आव्हाड यांनी देखील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास अवचट महाराष्ट्र आर्किटेक असोसिएशनचे पदाधिकारी विविध आर्किटेक्ट महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600