जिल्हा
वसई बीचवर अत्याचार, बेशुद्ध अवस्थेत आढळली
रिक्षाचालकाला घेतले ताब्यात
मुंबई: रिक्षाचालकाने 21 जानेवारी 2025 रोजी 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना राम मंदीर परिसरात घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीने अत्याचार केल्याचे कबूल केले आहे.
सदर घटनेतील आरोपी रिक्षाचालकाचे नाव राजरतन सदाशिव वायवळ असून तो 32 वर्षांचा असून त्याला दोन मुली असल्याची माहिती मिळाली आहे. राजरतन वायवळला नालासोपारा वाळीव येथील खैरपाड्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरणानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमूखे वनराई पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
राम मंदिर स्टेशनजवळ एका 20 वर्षीय तरुणीवर 21 जानेवारी 2025 रोजी बलात्कार करण्यात आला. सिझेरियन ब्लेड आणि दगडांसह हल्ला रिक्षाचालकाने पीडितेवर हल्ला केल्याचे समोर आले. पीडित मुलगी मुंबईतील राम मंदिर स्टेशनच्या आवारात 22 जानेवारी रोजी बेशुद्ध अवस्थेत आढळली. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी रिक्षा चालकाला अटक केली असून पुढील तपास वनराई पोलीस करत आहे.
वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सदर गुन्हाच्या तपासाकरीता परिमंडळीय पथके तयार करण्यात आली. बळीत मुलीकडून प्राप्त माहितीच्या आधारे विरार ते चर्चगेट रेल्वे परिसर, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदार यांच्या आधारे आरोपी नामे राजरतन सदाशिव वायवळ, वय 32 यास खैरपाडा, वालीव येथील झोपडपट्टीमधुन ताब्यात घेण्यात पोलीस पथकास यश आले.
ADVERTISEMENT 300×250
ADVERTISEMENT 300x600