जिल्हा

पाऊस लांबल्याने फ्लेमिंगो पक्षांचे आगमन लांबणीवर

पाऊस लांबल्याने फ्लेमिंगो पक्षांचे आगमन लांबणीवर
पाऊस लांबल्याने फ्लेमिंगो पक्षांचे आगमन लांबणीवर फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: दरवर्षी हिवाळ्यात नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्रात परदेशी पाहुणे म्हणजेच फ्लेमिंगो पक्षांचे आगमन होते. यंदा मात्र पाऊस लांबल्याने फ्लेमिंगो पक्षांचे आगमन देखील लांबणार असल्याची माहिती ऐरोली येथील किनारी व सागरी जैवविविधता केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली. मागील काही वर्षांपासून नवी मुंबई शहरात फ्लेमिंगो पक्षांचे आगमन होत असल्याने या पक्षांना पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. या पक्षांचे जवळून निरीक्षण करता यावे म्हणून ऐरोली येथील किनारी व सागरी जैवविविधता केंद्रातर्फे फ्लेमिंगो बोट सफरीची व्यवस्था करण्यात आली आहे. या बोटीतून पर्यटकांना ठाणे खाडीतील फ्लेमिंगो पक्षी पाहता येतात. फ्लेमिंगो पक्षी हे इराण, अफगाणिस्तान आणि इस्त्रायलमधून भारतातील विविध पाणथळ क्षेत्रात हिवाळ्यादरम्यान येत असतात. भारतात सर्वप्रथम गुजरातमधील कच्छ येथील पाणथळ क्षेत्रात आगमन होते. गुजरात कच्छनंतर फ्लेमिंगो पक्षांचा पुढील मुक्काम हे नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्र असते. त्यामुळे फ्लेमिंगोच्या आगमनाची चाहूल लागताच त्यांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमी, पर्यटकांची पावले वळत असल्याने या पक्षांच्या आगमनाची प्रतीक्षा पर्यटकांना लागली आहे. मात्र यंदा नोव्हेंबर महिना उजाडला तरी देखील पाऊस सुरूच राहिला, त्यामुळे यंदा फ्लेंमिंगो पक्षांचे आगमन देखील लांबणार असल्याची माहिती ऐरोली येथील किनारी व सागरी जैवविविधता केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित बातम्या

ADVERTISEMENT 300×250

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
ADVERTISEMENT 300x600